Jagdish Patil
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली.
या निवडणुकीत भाजपचे 89 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आलेत.
तब्बल 75 हजार कोटींहून जास्त बजेट असलेल्या या महापालिकेत विजयी झालेल्यांपैकी काही नगरसेवक कोट्याधीश आहेत.
या श्रीमंत नगरसेवकांच्या यादीत भाजप पहिल्या क्रमांकावर आहे तर त्यापाठोपाठ दोन्ही शिवसेना आहेत.
तर BMC मधील टॉप दहा नगरसेवकांच्या यादीत भाजपचे मकरंद नार्वेकर 124 कोटींच्या संपत्तीसह अव्वल स्थानी आहेत.
त्यांच्या पाठोपाठ भाजपचेच चंदन शर्मा (84 कोटी 77 लाख) आणि हर्षिता नार्वेकर (63 कोटी) यांचा नंबर आहे.
चौथ्या स्थांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या मिनल तुर्डे या असून त्यांची संपत्ती 55 कोटी 17 लाख 50 हजार 842 रुपये इतकी आहे.
काँग्रेसच्या तुलिप मिरांडा यांची संपत्ती 50 कोटी 69 लाख आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांची 46 कोटी 34 लाखांची संपत्ती आहे.
त्यानंतर भाजपच्या अनिता वैती, हेतल गाला यांचा नंबर लागतो. वैती यांची 28 कोटी 88 लाखांची तर गाला यांची 27 कोटी 93 लाखांची संपत्ती आहे.
तर ठाकरेंच्या शिवसेनेचे यशोधर फणसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे भास्कर शेट्टी यांच्याकडे प्रत्येकी 25 कोटींची संपत्ती आहे.
वरील सर्वाधिक 10 श्रीमंत नगरसेवकांच्या यादीत भाजपचे 5 ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या शिवेसेनेचे प्रत्येकी 2 तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.