Roshan More
आशा भोसले यांचा जन्म जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी मंगेशकर कुटुंबात झाले. त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते.
त्या नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आशा आणि लता या बहिणींवर लहान वयापासूनच कुटुंबाची जबाबदारी घेतली.
वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी 'माझा बाळ' या मराठी चित्रपटात आपले पहिले गाणे गायले. हिंदी चित्रपट 'चुनरिया' या हिंदी चित्रपटासाठी 1948 मध्ये 'सावन आया' हे गाण्यातून त्यांनी बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले.
त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये 1200 हजार गाणी गायली.
त्यांनी प्रत्येक संगीत प्रकारात आपल्या गाण्यांची छाप सोडली. शास्त्रीय, भजन, कव्वाली, पॉप, कॅबरे प्रत्येक संगीत प्रकारात त्यांनी गाणी गायली.पिया तू अब तो आजा , दम मारो दम,चुरा लिया है तुमने, इन आँखों की मस्ती, रंगीला रे अशी एका पेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.
लता मंगेशकरांचे सचिव असलेल्या 30 वर्षीय गणपतराव भोसले यांच्याशी आशा भोसलेंनी वयाच्या 16 व्या वर्षी कुटुंबीयांच्या विरोधात जात लग्न केले. पुढे ते त्यांच्यापासून विभक्त झाल्या.
रोमँटिक, गझल, पॉप, कॅबरे, शास्त्रीय अशा विविध प्रकारच्या गाण्यांमध्ये त्यांची पकड होती. संगीतकार आर डी बर्मन यांच्यासोबतीची त्यांची जोडी खूप गाजली. 1980 मध्ये त्यांनी आर डी बर्मन यांच्यासोबत लग्न केले.