वयोवृद्ध पालकांना न सांभाळणाऱ्यांना सरकारचा मोठा दणका, वेतनात कपात करणारं विधेयक विधानसभेत मंजूर...

Jagdish Patil

तेलंगणा सरकार

वयोवृद्ध पालकांची काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला होता.

Telangana Parent Care Law | Sarkarnama

तरतुदी

या संबंधित विधेयक सरकारने विधानसभेत मंजूर केलं असून यामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत ते जाणून घेऊया.

Telangana Parent Care Law | Sarkarnama

दणका

पालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना या नव्या विधेयकाचा दणका बसणार आहे.

Telangana Parent Care Law | sarkarnama

रेवंथ रेड्डी

मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी हे विधेयक वयोवृद्धांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी तयार केल्याचं म्हटलं आहे.

Telangana Parent Care Law | Sarkarnama

काळजी

हा कायदा कर्मचारी हतबल पालकांची काळजी घेतात की नाही, हे निश्चित करण्यासाठी बनवल्याचं सरकारने सांगितलं.

Telangana Parent Care Law | Sarkarnama

मासिक खर्च

2007 च्या कायद्यात पालकांना मासिक देखभाल खर्च मिळवण्यासाठी न्यायाधिकरणाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत होत्या.

Telangana Parent Care Law | Sarkarnama

देखभाल

मात्र, नवीन कायद्यात थेट मुलांच्या खात्यातून पालकांच्या देखभालीचा खर्च कापला जाणार आहे.

Telangana Parent Care Law | Sarkarnama

60 दिवस

तर वयोवृद्ध पालकांची प्रकरणे 60 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना मार्गी लावाणं बंधनकारक असेल.

Telangana Parent Care Law | Sarkarnama

कपात

पालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचार्‍यांच्या वेतनातून 10 टक्के रक्कम कपात केली जाणार आहे.

Telangana Parent Care Law | Sarkarnama

जिल्हाधिकारी

पालकांशी संबंधित प्रकरणे हाताळण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत.

Telangana Parent Care Law | Sarkarnama

उत्पन्नाचे स्त्रोत

पालकांना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर करून त्यांना उत्पन्नाचे स्त्रोत उघड करणे आवश्यक आहे.

Telangana Parent Care Law | Sarkarnama

थेट खात्यात

प्रकरणाच्या सुनावणीनंतर मुलांच्या वेतनातून कपात झालेली रक्कम थेट पालकांच्या खात्यात जमा केली जाईल.

Telangana Parent Care Law | Sarkarnama

NEXT : युद्ध थांबलं! पण ट्रम्प यांची कोंडी करणाऱ्या इराणच्या 'त्या' 10 अटी कोणत्या?

Strait of Hormuz
क्लिक करा