खरात प्रकरणात बदनामी केली म्हणून चाकणकरांनी थेट दिल्ली हायकोर्टातून ज्यांना नोटीस पाठवली त्या आशा मिरगे कोण?

Jagdish Patil

रूपाली चाकणकर

भोंदू खरात प्रकरणात नाव आल्याने रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Rupali Chakankar controversy | Sarkarnama

लढाई

त्यानंतर त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. हे आरोप करणाऱ्यांविरोधात त्यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Rupali Chakankar controversy | Sarkarnama

संबंध

त्यांनी खरातच्या आर्थिक व्यवहाराशी, माझा संबंध नव्हता. मी कोणत्याही महिलेला खराताकडे नेलेलं नाही, असं सांगितलं.

Rupali Chakankar controversy | Sarkarnama

टीका

तसंच या प्रकरणात माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ नसताना माझ्यावर अतिशय अश्लील भाषेत टीका झाल्याचंही म्हटलं.

Rupali Chakankar Political Journey | Sarkarnama

लढाई

पुरावा नसताना माझ्यावर केलेले आरोप वेदनादायी होते म्हणून माझी लढाई कायद्याच्या चौकटीतून लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Rupali Chakankar

आशा मिरगे

यावेळी त्यांनी आशा मिरगे या बाईने डिबेट शोमध्ये अतिशय असभ्य भाषेत विधाने केल्याचा उल्लेख केला.

Asha Mirge

नोटीस

मिरगे यांना ४ एप्रिलला पाठवलेली नोटीस त्यांनी स्वीकारली नाही, म्हणून त्यांना एकूण तीन नोटीस पाठवल्याचंही त्यांनी सांगितंलं.

Asha Mirge | Sarkarnama

आरोप

तर चाकणकर यांनी थेट आपल्यावर असभ्य भाषेत टीका केल्याचा आरोप केलेल्या आशा मिरगे कोण आहेत ते जाणून घेऊया.

Asha Mirge

स्त्रीरोगतज्ज्ञ

व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. आशा मिरगे या महाराष्ट्रातील एक वरिष्ठ राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत.

Asha Mirge | Sarkarnama

सदस्य

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य होत्या.

Asha Mirge | Sarkarnama

NEXT : बीडमध्ये गोदाकाठी आक्रोश अन् किंकाळ्या, बोट दुर्घटनेचे भयानक फोटो समोर...

Purushottampuri Boat Accident | Sarkarnama
क्लिक करा