Jagdish Patil
'अधिक मासानिमित्त बीड जिल्ह्यातील माजलगांव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
यंदा तीन वर्षानंतर हा योग आल्याने पुरुषोत्तमपुरीत दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
मात्र, याच ठिकाणी बोट चालकाने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने गोदावरी पात्रात बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे.
याच दुर्घटनेचे भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारे फोटो आता समोर आले आहेत.
या फोटोत महिला, पुरुष जीवाच्या आकांताने आक्रोश करताना दिसत आहेत.
बोट बुडाल्याचं दिसताच उपस्थित नागरिकांनी तात्काळ नदीत उड्या मारल्या आणि बुडणाऱ्यांना वाचवलं.
मात्र या दुर्दैवी घटनेत दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेनंतर प्रशासनाने पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा फोल ठरला आहे.
संतप्त भाविकांनी आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसल्याचा आरोप केला आहे.
10 लोकांची क्षमता असताना बोटीत 50 लोक बसवल्याचा आरोप दुर्घटनेतून बचावलेल्या काही महिलांनी केला आहे.