Jagdish Patil
आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली.
तर मानाचे वारकरी म्हणून कैलास दामु उगले आणि त्यांची पत्नी कल्पना उगले यांनी केली.
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत दाखल झालेत.
लाखो वारकऱ्यांच्या मनात विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याची इच्छा असते. तो मान मिळालेले कैलास उगले हे नेमके कोण आहेत ते जाणून घेऊया.
राज्याचे मुख्यमंत्र्यासोबत विठुरायाची महापूज केलेल्या कैलास उगले हे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील रहिवासी आहेत.
ते शेतकरी असून मागील 12 वर्षांपासून ते पंढरपूर वारी करत आहेत. या निष्ठेचेच फळ त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
आता त्यांची निवड मानाच्या वारकऱ्यांमध्ये करण्यात आली. कैलास उगले पत्नी कल्पना उगले यांनी देखील पहाटे मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.
उगले यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून पंढरीतील लाखो भाविकांच्या वतीने सन्मान दिला जाणार आहे.