जयंत पाटलांच्या वडिलांच्या हस्ते पहिल्यांदा विठ्ठलाची 'शासकीय' महापूजा झाली होती...

Hrishikesh Nalagune

परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री.विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

Vitthal Mahapuja | sarkarnama

पण तुम्हाला पहिली शासकीय महापूजा कधी आणि कोणाच्या हस्ते झाली होती?

इंग्रज राजवटीच्या काळात हिंदू कलेक्टर, प्रांत किंवा सेवाज्येष्ठतेनुसार अधिकारी सरकार तर्फेची पूजा करीत होते.

Pandharpur Vitthal Temple | Sarkarnama

1963 साली तत्कालिन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनीही सरकारतर्फे होणारी महापूजा केली होती.

पण 1965 साली श्री.विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा अधिकृतरित्या 'मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांतर्फेच' करण्याचा ठराव झाला.

त्याचवर्षी राजारामबापू पाटील कॅबिनेट मंत्री झाले आणि महसूलमंत्री पदाची जबाबदारी मिळाली.

त्यावेळी राजारामबापू पाटील आणि पत्नी कुसुमताई यांना पहिल्यांदा शासकीय महापूजेचा मान मिळाला.

महापूजेवेळी राजारामबापू पाटील यांचे वडील आणि 16 ते 4 वयातील विजया, उषा, भगत आणि जयंत ही चार मुले हजर होती.

9 जुलै 1965 रोजी आषाढी एकादशीची महापूजा संपन्न झाल्यानंतर 10 जुलै 1965 च्या 'सकाळ' वृत्तपत्रात याबाबतची बातमी छापून आली होती.

विठुरायाच्या कपाळावर काळा टिळा का? कारण ऐकून डोळे पाणावतील

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vitthal | Sarkarnama
येथे क्लिक करा