Charan Seva Warkaris : वारकरी 'चरण सेवा' उपक्रम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे तरी काय?

Pradeep Pendhare

वारकरी चरण सेवा

आषाढी वारीला पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी 'चरण सेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.

Charan Seva Warkaris | Sarkarnama

उपक्रमाचे माध्यम

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीनं हा उपक्रम राबवविला जातो.

Charan Seva Warkaris | Sarkarnama

फडणवीसांची संकल्पना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, सेवाभावी संघटना यात सहभागी होऊ शकतात.

Charan Seva Warkaris | Sarkarnama

या जिल्ह्यांचा समावेश

'चरण सेवा' उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या 11 जिल्ह्यांचा समावेश आहे.

Charan Seva Warkaris | Sarkarnama

आरोग्य सुविधा

पालखी मार्गावरील सुमारे 400 विश्रांती व मुक्काम स्थळी वारकऱ्यांसाठी चरण सेवा, वैद्यकीय तपासणी, प्राथमिक उपचार तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

Charan Seva Warkaris | Sarkarnama

डाॅक्टरांचा सहभाग

12 हजारांहून अधिक प्रशिक्षित डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय व फिजिओथेरपीचे विद्यार्थी तसेच स्वयंसेवका सहभाग.

Charan Seva Warkaris | Sarkarnama

तेलाद्वारे मालिश

वारीदरम्यान दररोज पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायांच्या मालिशसाठी 3 हजार लिटर आयुर्वेदिक तेलाची व्यवस्था केली जाते.

Charan Seva Warkaris | Sarkarnama

आरोग्य जनजागृती

सार्वजनिक आरोग्यविषयी 8 आरोग्य रथांच्या माध्यमातून पालखी मार्गावरील वारकरी आणि नागरिकांपर्यंत जनजागृती केली जाते.

Charan Seva Warkaris | Sarkarnama

गतवर्षीचा उपक्रम

गतवर्षी या उपक्रमाद्वारे सुमारे पावण दोन लाख वारकऱ्यांना थेट चरण सेवा, तर 10 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचवण्यात आला.

Charan Seva Warkaris | Sarkarnama

NEXT : 'सार्वजनिक सुरक्षा विधेयक' ठरणार कर्दनकाळ

येथे क्लिक करा :