Ganesh Sonawane
' नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरीही माझी तयारी आहे' असं विधान केल्याने जालन्याच्या जिल्हाधिकारी IAS आशिमा मित्तल सध्या चर्चेत आल्या आहेत.
जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून आमिशा मित्तल यांनी उपोषण स्थळी जाऊन विशेष प्रयत्न केले. त्यांच्यावर जरांगे रागावले पण त्यांनी संयम राखला.
मूळच्या राजस्थानमधील जयपूर येथील रहिवासी असलेल्या आशिमा मित्तल या अत्यंत धडाकेबाज अधिकारी मानल्या जातात.
त्यांनी देशातील नामांकित आयआयटी मुंबई (IIT Bombay) मधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. (B.Tech) पूर्ण केले आहे.
त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल त्यांना प्रतिष्ठित 'शंकर दयाल शर्मा सुवर्णपदक' देऊन सन्मानित करण्यात आले होते.
इंजिनिअरिंगनंतर त्यांनी मानववंशशास्त्र (Anthropology) विषयात एम.ए. (MA) पूर्ण केले.
लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत २०१८ ला त्यांनी देशभरातून १२ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले.
त्या महाराष्ट्र केडरच्या २०१८ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.