विधानसभेचे उपाध्यक्ष अन् 5 टर्म आमदार..., मी भ्रष्टाचार केला नाही म्हणत आयुष्य संपवलेल्या आशिष बॅनर्जींची हिस्ट्री...

Jagdish Patil

आशिष बॅनर्जी

TMCचे ज्येष्ठ नेते आणि बंगाल विधानसभेचे माजी उपसभापती आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह पक्षाच्या कार्यालयात आढळून आला.

Ashish Banerjee Death | Sarkarnama

सुसाइड नोट

पोलिसांनी, त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला असून घटनास्थळावरून एक सुसाइड नोटही जप्त केल्याचं सांगितलं.

Ashish Banerjee Death | Sarkarnama

दावा

सुसाइड नोटमध्ये आशिष बॅनर्जी यांनी आपण कधीही भ्रष्टाचारात सहभागी झालो नसल्याचा दावा केला आहे.

Ashish Banerjee Death | Sarkarnama

भ्रष्टाचार

कोणतेही काम करून देण्यासाठी आपण कधीही पैसे घेतले नाहीत, असेही त्यांनी लिहिलं आहे.

Ashish Banerjee Death | Sarkarnama

कोण होते बॅनर्जी?

आशिष बॅनर्जी हे बंगालच्या राजकारणातील TMC चे ज्येष्ठ नेते होते.

Ashish Banerjee Death | Sarkarnama

आमदार

ते बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट विधानसभा मतदारसंघातून 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

Ashish Banerjee Death | Sarkarnama

उपसभापती

त्यांनी ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसंच ते बंगाल विधानसभेचे उपसभापतीही झाले.

Ashish Banerjee Death | Sarkarnama

प्राध्यापक

राजकारणात येण्यापूर्वी बॅनर्जी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे बर्दवान विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पदवी होती.

Ashish Banerjee Death | Sarkarnama

कृषिमंत्री

ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये त्यांनी विविध विभागांची जबाबदारी सांभाळली. 2017 ते 2021 या काळात ते बंगालचे कृषिमंत्री होते.

Ashish Banerjee Death | Sarkarnama

पराभव

2026 च्या विधानसभा निवडणुकीत रामपूरहाट मतदारसंघातून बॅनर्जी यांचा भाजपच्या ध्रुव साहा यांनी पराभव केला.

Ashish Banerjee Death

राजीनामा

या पराभवानंतर त्यांनी बीरभूम जिल्हा TMC अध्यक्षपद आणि जिल्हा कोअर कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

TMC | Sarkarnama

NEXT : अभिजीत दिपकेंनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच सुरु केलं 'स्कूल ठीक करो' अभियान; फोटो पाहिलेत का...?

Abhijeet dipke School Thik Karo Abhiyan | Sarkarnama
क्लिक करा