अभिजीत दिपकेंनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच सुरु केलं 'स्कूल ठीक करो' अभियान; फोटो पाहिलेत का...?

Deepak Kulkarni

सीजेपीचं 'स्कूल ठीक करो'

दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या यशस्वी आंदोलनानंतर 'कॉक्रोच जनता पार्टी'ने देशभरात 'स्कूल ठीक करो' या नवीन अभियानाची घोषणा केली आहे.

Abhijeet dipke School Thik Karo Abhiyan | Sarkarnama

आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार

सीजेपीच्या अभिजीत दीपके यांनी या मोहिमेची सुरुवात केली असून याद्वारे राज्यातील ग्रामीण आणि सरकारी शाळांच्या दुरावस्थेविरोधात उठवलेला आवाज सरकारपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

Abhijeet dipke School Thik Karo Abhiyan | Sarkarnama

हिंगोलीतून अभियानाला सुरुवात

देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनी सीजेपीच्या अभिजीत दीपकेंनी हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ संतुक पिंपरी गावातून स्कूल ठीक करो या शैक्षणिक उपक्रमाला सुरुवात केली.

Abhijeet dipke School Thik Karo Abhiyan | Sarkarnama

ध्वजारोहण

अभिजित दिपके यांच्याहस्तेच संतूक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. 

Abhijeet dipke School Thik Karo Abhiyan | Sarkarnama

खुर्ची नाकारली

अभिजीत दीपके यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना एक उत्तम आदर्शही त्यांच्यासमोर ठेवला. त्यांनी खुर्चीवर बसणं नाकारत जमिनीवर बसणं पसंद केलं.

Abhijeet dipke School Thik Karo Abhiyan | Sarkarnama

पालकांसोबत चर्चा

त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसोबत शिक्षणाचा दर्जा, शाळेतील मूलभूत सुविधा,पाल्यांची सुरक्षितता यांसारख्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी पालकांच्याही समस्या ऐकून घेतल्या. 

Abhijeet dipke School Thik Karo Abhiyan | Sarkarnama

अभियानामागचा उद्देश

दिपके यांच्यासह त्यांच्या 'सीजेपी' चळवळीचा या अभियानामागचा उद्देश हा राज्यातील ग्रामीण भागातील शाळांची झालेली दुरावस्था आणि शिक्षणाची वाताहत लोकांसह सरकारसमोर आणण्याचा हा आहे.

Abhijeet dipke School Thik Karo Abhiyan | Sarkarnama

शिक्षकांसाठी एकच काम

विद्यार्थ्यांना शिकवणे हेच शिक्षकांसाठी एकच काम असायला हवं.एसआयआर किंवा इतर सरकारी कामांसाठी दुसरे लोक नियुक्त करा असं सांगतानाच या कामांसाठी अनेक बेरोजगार तरुण असल्याची आठवणही करुन दिली.

Abhijeet dipke School Thik Karo Abhiyan | Sarkarnama

गंभीर स्थिती

तसेच या अभियानाच्या सुरुवातीलाच दिपके यांनी शाळेला भेट दिल्यावर त्यांना शाळेच्या इमारती आणि सोयीसुविधांची गंभीर स्थिती निदर्शनास आली. तसेच तुटलेल्या खिडक्या, अत्यंत अस्वच्छ स्वच्छतागृह असं भयानक वास्तवही समोर आलं.

Abhijeet dipke School Thik Karo Abhiyan | Sarkarnama

NEXT: भारताच्या पहिल्याच स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला महात्मा गांधी का उपस्थित नव्हते?

Indias-First-Independence-Day-And-Mahatama-Gandhi-absent.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...