सरकारनामा ब्यूरो
आशिष गुप्ता यांनी मेहनत आणि जिद्दीच्या बळावर UPSC परीक्षा उत्तीर्ण करत IPS बनले पण त्यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे काय आहे तो जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेश केडरचे वरिष्ठ IPS अधिकारी आशिष गुप्ता यांनी त्यांच्या निवृत्तीच्या दोन वर्ष आधीच राजीनामा देण्याची ठरवले आहे.
1989 च्या बॅचचे IPS अधिकारी असून त्यांनी सरकारकडे 'व्हीआरएस' (स्वेच्छा निवृत्ती) मागितली आहे.
आशिष गुप्ता हे उत्तर प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ IPS अधिकारी असून सध्या ते उत्तर प्रदेशचे डीजी रूल्स अँड मॅन्युअल्स या पदावर कार्यरत आहेत.
मूळचे लखनऊचे रहिवासी असलेले आशिष गुप्ता यांनी IIT ची परीक्षा दिली आणि IIT कानपूरमध्ये निवड झाल्यानंतर, त्यांनी संगणक शास्त्रात बी.टेकची पदवी प्राप्त केली. तसेच त्यांनी IIM मधून एमबीए केले.
एमबीए पूर्ण झाल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. परीक्षा उत्तीर्ण करत 1988 ला त्यांची IPS साठी निवड करण्यात आली.
एक वर्षाच्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 1989 मध्ये त्यांची नियुक्ती यूपी कॅडरचे IPS अधिकारी म्हणून म्हणून झाली. तेव्हापासून त्यांनी अनेक वेगवेगळी पदे भूषवली आहेत.