सरकारनामा ब्यूरो
उल्हासनगरच्या प्रांजल पाटील या, भारतातील पहिल्या दृष्टिहीन IAS अधिकारी बनल्या आहेत.
वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी त्यांचा एक डोळा गमावला. काही दिवसानंतर आजारापणामुळे त्यांना दुसराही डोळा गमवावा लागला.
दृष्टिहीन झाल्यानंतरही त्यांनी हार न मानता कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अनेक अडचणींवर मात करून स्वबळावर यश प्राप्त केले.
त्यांनी सेंट झेविअर्स या कॉलेजमधून राज्यशास्त्राची पदवी प्राप्त करून जेएनयू येथून MA, Master of Philosophy (MFL) आणि नेट सेटची परीक्षाही त्यांनी उत्तीर्ण केली आहे.
जेएनयूमध्ये शिकत असताना त्यांनी UPSC परीक्षेचा अभ्यास सुरु केला. परीक्षेसाठी त्यांनी विशेष सॉफ्टवेअरची मदत घेतली होती.
प्रांजल यांनी दृष्टिहीन लोकांसाठी 'जेएडब्लूएस सॉफ्टवेअरही' तयार केलं आहे.
2017ला त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात 124वा रँक मिळवत UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि केरळ केडर मिळावले.
तिरुअनंतरपुरमच्या उप-जिल्हाधिकारी आणि एर्नाकुलमच्या जिल्हा दंडाधिकारी या पदाचा प्रांजल यांनी कार्यभार सांभाळला. सध्या त्या दिल्लीतील शिक्षण संचालनालयात अतिरिक्त संचालक (प्रशासन) या पदावर कार्यरत आहेत.