Chetan Zadpe
मुंबई भाजपचे नेते आणि आमदार नेहमी जीन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये दिसतात. मात्र, हिवाळी अधिवेशनात त्यांचा खादी आणि जॅकेटमधला हटके लूक व्हायरल झाला आहे.
पांढरा खादीचा शर्ट आणि त्यावर प्रस्थापित राजकीय नेते घालतात तसा जॅकेट त्यांनी परिधान केला आहे. यामुळे त्यांची चर्चा होती.
अधिवेशनानंतर एका खासगी कार्यक्रमातही आशिष शेलार यांनी याच लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधले.
आशिष शेलार यांच्या या लूकमुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे पुढचे विस्तार होणार का? अशा चर्चांना उधाण आले होते.
खादीचा शर्ट आणि जॅकेट परिधान करून त्यांनी एका मंचावरून भाषण केले.
या लूकमुळे आशिष शेलारांना मंत्रिपद मिळण्याची शाश्वती मिळाली का? अशीही चर्चा सुरू झाली होती.
खादी आणि जॅकेटमध्ये त्यांनी विधानसभेत आपले संबोधन केले.