सरकारनामा ब्यूरो
सोलापूर येथील काँग्रेस नेत्या तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांचा आज (शनिवार) वाढदिवस आहे.
वडिलांप्रमाणे प्रभावी, कर्तृत्ववान आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या प्रणिती या महाराष्ट्रातील 'ग्लॅमरस' राजकारणी म्हणून लोकप्रिय आहेत.
प्रणिती या वयाच्या 28 व्या वर्षी आमदार झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या तरुण महिला आहेत.
त्यांनी मुंबई येथील 'सेंट झेव्हिअर' कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
मुंबई विद्यापीठातून त्यांनी कायदा विषयात पदवी प्राप्त केली.
प्रभावी वक्तृत्वामुळे प्रणिती यांनी महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींच्या मनात स्थान मिळवले आहे.
2014 मध्ये झालेल्या सोलापूर विधानसभा निवडणुकीत त्या बहुमताने निवडून आल्या होत्या.
सोलापूर येथील 'जाई जुई विचार मंच'या समाजसेवी संस्थेच्या प्रणिती या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.
वडिलांकडून राजकारणाचे धडे घेत त्यांनी राजकारणात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आणि सलग तीन वेळा विधानसभेत निवडून आल्या.