Congress Leader : काँग्रेस सोडून गेलेले महाराष्ट्रातील महत्वाचे नेते

Vijaykumar Dudhale

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी 2008 ते 2009 आणि 2009 ते 2010 असे दोन वेळा मुख्यमंत्री होते. चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला.

Ashok Chavan | Sarkarnama

मिलिंद देवरा

मिलिंद देवरा हे 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. डॉ. मनमोहन सिंंग यांच्या सरकारमध्ये ते केंद्रात राज्यमंत्री होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Milind Deora | Sarkarnama

बाबा सिद्धिकी

बाबा सिद्धिकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 1999, 2004 आणि 2009 असे सलग तीनवेळा निवडून आले. याशिवाय त्यांनी राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Baba Siddique | Sarkarnama

आशिष देशमुख

आशिष देशमुख हे काटोल मतदारसंघातून आमदार होते. त्यांनी मागील विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढवली हेाती. मात्र, 2023 मध्ये ते काँग्रेसमधून पुन्हा भाजपत केले.

Ashish Deshmukh | Sarkarnama

अमर राजूरकर

अमर राजूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. 2010 ते 2016 आणि 2016 ते 2022 पर्यंत विधान परिषदेचे आमदार होते. त्यांनी चव्हाण यांच्यासोबत काल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि आज भाजपमध्ये प्रवेश केला

Amarnath Rajurkar | Sarkarnama

सत्यजित तांबे

सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. मात्र, त्यांना काँग्रेस पक्षाने तिकिट दिले नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांनी कुठल्याही पक्षात अद्याप प्रवेश केलेला नाही.

Satyajeet Tambe | Sarkarnama

कृपाशंकर सिंह

कृपाशंकर सिंह हे काँग्रेस आमदार होते. त्यांनी 2008 मध्ये काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. तसेच, ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांनी 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

Kripashankar Sinh | Sarkarnama

प्रियांका चतुर्वेदी

प्रियांका चतुर्वेदी ह्या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम करत होत्या. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेने राज्यसभेची पाठविले आहे.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

NEXT : नेमका काय होता कथित 'आदर्श घोटाळा'? पाहा एका क्लिकवर

येथे क्लिक करा