Adarsh Scam : नेमका काय होता कथित 'आदर्श घोटाळा'? पाहा एका क्लिकवर...

Chetan Zadpe

'आदर्श घोटाळा...' -

अशोक चव्हाण हे काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री कथित आदर्श घोटाळा चर्चेत आला होता. यासाठी काँग्रेसने चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता.

Adarsh Scam | Sarkarnama

फडणवीस सरकारमध्ये चौकशी -

फडणवीस यांच्याकडून चव्हाणांविरूद्ध खटला दाखल व्हावा यासाठी शिफारस राज्यापालांकडे केली. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी ही परवानगी नाकारली. मात्र, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली होती.

Devendra Fadnavis | Sarkarnama

हायकोर्टात धाव -

चव्हाण यांनी फडणवीस सरकार आणि तेव्हाचे राज्यपालांविरोधात हायकोर्टात धाव घेतली. न्या. रणजित मोरे आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने 23 डिसेंबर 2017 रोजी राज्यपालांची खटल्याबाबत दिलेली परवानगी रद्द ठरवली.

Adarsh Scam | Sarkarnama

प्रकरण थंड पडले -

या प्रकरणात सबळ पुरावे उपलब्ध झाले नसल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर सीबआयकडून सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान देण्यात आले. तेव्हापासून हे प्रकरण थंड पडले.

Adarsh Scam | Sarkarnama

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आरोपी -

सीबीआय - ईडी या दोन्ही यंत्रणांकडून अशोक चव्हाण यांनाच या प्रकरणी आरोपी बनवले आहे, परंतु खटला अतिशय संत गतीने पुढे जात आहे.

Adarsh Scam | Sarkarnama

शहीदांच्या विधवा पत्नींना जमीन -

1999 च्या कारगिल युद्धातील वीर आणि युद्धातील शहीदांच्या विधवा पत्नींना आदर्श सोसायटीची जमीन देण्यात आली होती. मात्र यातील 40% नागरिकांना बेकायदेशीरपणे घरे देण्यात आल्याचा आरोप आहे.

Adarsh Scam | Sarkarnama

सनदी अधिकारी फाटक यांना अटक -

तेव्हाचे महापालिका आयुक्त जयराज फाटक यांच्यासोबत इतर 12 जणांची नावे यामध्ये आली आहेत. या प्रकरणी जयराज फाटक यांना अटक करण्यात आली होती.

Adarsh Scam New | Sarkarnama

लढाई आम्ही जिंकणार -

आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लढाई करत आहोत. ही लढाई आम्ही जिंकणार असा विश्वास आहे. आदर्श सोसायटी सदस्य भावेश पटेल यांनी म्हटले आहे.

Adarsh Scam | Sarkarnama

NEXT : 'अहलान मोदी' म्हणजे काय? Modi यूएईला रवाना...

क्लिक करा...