Vijaykumar Dudhale
अमर राजूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. 2010 ते 2016 आणि 2016 ते 2022 पर्यंत विधान परिषदेचे आमदार होते. त्यांनी आज चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
माधवराव पाटील जवळगावकर हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदासंघातून 2009 आणि 2019 या निवडणुकांतून दोन वेळा निवडून आले आहेत.
नांदेड दक्षिण मतदारसंघातून मोहन हंबर्डे हे काँग्रेसच्या तिकिटावर 2019च्या निवडणुकीत प्रथमच निवडून आले आहेत.
जितेश अंतापूरकर हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघातून 2021 च्या पोटनिवडणुकीत निवडून आले आहेत. 2009 आणि 2019 च्या निवडणुकीत जितेश यांचे वडिल रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. मात्र, रावसाहेब अंतापूरकर यांच्या मृत्युमुळे 2021 च्या निवडणुकीत काँग्रेसने जितेश यांना तिकिट दिले होते.
अमित झनक हे वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले आहेत. 2014 मध्ये अमित झनक यांच्या उमेदवारीसाठी अशोक चव्हाण हे आग्रही होते. चव्हाण यांच्यामुळे अमित यांना त्यावेळी तिकिट मिळाले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातून सुभाष धोटे हे 2009 आणि 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले आहेत
राजू आवळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर प्रथमच निवडून आले आहेत. ते सध्या कोल्हापूर जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे वडिल जयवंतराव आवळे हे लातूरचे माजी खासदार आहेत.
हिरामण खोसकर हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर 2019 मध्ये प्रथमच विधानसभेवर निवडून गेले आहेत.
उत्तर प्रदेशच्या 'लेडी सिंघम'; श्रेष्ठा ठाकूर...