Deepak Kulkarni
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात हा शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या अटकेत आहे.
अशोक खरातवर आधीच 12 गुन्हे दाखल आहेत. एसआयटीकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं होतं. खरातच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करणार असून, प्राथमिक तपास सुरु केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली होती.
अशोक खरात प्रकरणानं संपूर्ण राज्यासह देश हादरला आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली नको ते धंदे केले जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
या सगळ्या घटनानंतर आता एका गावानं अंधश्रद्धेला खतपाणी घालत भोंदूबाबा, बुवाबाजी करणाऱ्या फसवणूक गावबंदीचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारा राज्यातलं पहिला मान या गावानं पटकावलं आहे.
धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावात महिलांनी पुढाकार घेतला असून धडाकेबाज निर्णय घेताना भोंदूबाबांना गावबंदी केली आहे.
या गावातील महिलांनी एकत्र येत विशेष ठराव मंजूर करत भोंदूबाबांना गावात नो एन्ट्री केली आहे. या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.
निमगुळ येथील गावकऱ्यांनी एकत्र येत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून महिलांना भोंदूबाबांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. जर कोणी जबरदस्तीनं असा काही प्रकार केला तर जादूटोणाविरोधी कायद्याच्या आधारे महिला गुन्हा दाखल करणार आहेत.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातने महिलांचं शारीरिक शोषण करत आर्थिक माया जमवल्याचं समोर आलं आहे. तसेच त्याच्यावर सावकारकी,धमकावून जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.