Ganesh Sonawane
भोंदूबाबा खरातला वाढीव तीन दिवसांची (१ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणात SIT ला आणखी काही गोष्टींचा तपास करायचा आहे.
भोंदु अशोक खरात हा तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही म्हणून अधिक वेळ लागत आहे.
अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर केला आहे, त्याची समक्ष चौकशी करायची आहे.
खरात महिलांना खाण्यासाठी पेढा व पिण्यासाठी जे कडवट पाणी देत होता ते पिल्यानंतर गरगर व्हायचं खरात सांगेल तसे या महिला करायच्या हे नेमकं काय आहे याचा तपास करायचा आहे.
अशोक खरात ने भोंदूगिरी करत किती आणि कोठे कोणाच्या नावावर मालमत्ता जमा केली खरेदी केली याचा तपास करायचा आहे.
अशोक खरात याने जे कृत्य केले जे गंभीर गुन्हे केले यात खराताला कोणी मदत केली आहे का?
तसेच या प्रकरणातील राजकीय लोकांचा सहभाग एसआयटीला तपासायचा आहे.
संशयित खरातकडून गुन्ह्याची माहिती घेऊन डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर पीडित महिलांची माहिती येणे बाकी आहे.
एसआयटीच्या चौकशीत अद्यापपर्यंत त्याने महिलांना गुंगी यावी असे काय तो वापरता होता, ते गुंगीकारक पदार्थ तो कोठून आणायचा याचा तपास करायचा आहे.