Jagdish Patil
सध्या राज्यभरात भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कारण मोठमोठ्या नेत्यांशी उठबस असलेल्या या खरातला अटक करणं खूप अवघड काम होतं.
मात्र, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चोर आल्याची अफवा पसरवून खरातच्या घरात शिरून त्याला अटक केली.
या कामगिरीबद्दल कर्णिक यांचं सर्वस्तरातून कौतुक केलं जातंय. तर याच पार्श्वभूमीवर कर्णिक यांची हिस्ट्री जाणून घेऊ.
संदीप कर्णिक हे 2004 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत.
त्यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी, मार्केटिंगमध्ये MBA आणि पोलीस व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
ते एप्रिल 2022 मध्ये पुण्यात सह पोलीस आयुक्तपदावर होते. तर मुंबईत अप्पर आयुक्त म्हणून कामं पाहिलं आहे.
याआधी त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये नाशिक पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
तर आता याच नाशिकमध्ये खरातला बेड्या ठोकल्यामुळे संदीप कर्णिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.