Ashok Kharat Wife Story: लग्नानंतर 'हाय-फाय लाईफ स्टाईल'ची चटक लागली, खरातच्या फरार बायकोची धक्कादायक स्टोरी वाचाच...

Deepak Kulkarni

पत्नीविरोधात गुन्हा

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानं राज्य हादरलं आहे. त्याच्यानंतर आता त्याची पत्नी कल्पना खरातसह पाच जणांविरोधात शिर्डीत बेकायदेशीर सावकारकी आणि जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात दाखल गुन्हा दाखल झाला

Ashok Kharat News | Sarkarnama

खरातवर अनेक गुन्हे दाखल

अशोक खरातवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच अनेक राजकारणीही त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा त्याची कसून चौकशी करताना पहायला मिळत आहेत.

Ashok Kharat | Sarkarnama

कल्पना खरात फरार

अशातच अशोक खरातची पत्नी कल्पना खरातही फरार झाली असून पसार असून, तिच्या शोधासाठी दोन पथक रवाना झालीत. परंतु कल्पनाचं दुसरं रूप पोलिस तपासातून समोर येताना दिसत आहे.

Ashok Kharat- Kalpana Kharat | Sarkarnama

लग्नानंतर लागली चटक

कल्पनाचं पूर्वीचं नाव हे सुनीता आहे. तिच्या माहेरकडील लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. पण अशोक खरातशी लग्न झाल्यानंतर कल्पना ऊर्फ सुनीता हिचं जीवन बदललं आणि हायप्रोफाईल लाईफ स्टाईलच्या जीवनाची चटक लागली.

Ashok Kharat- Kalpana Kharat | Sarkarnama

हलाखीची परिस्थिती

कल्पनाचे पूर्वीचे नाव, सुनीता आहे. ती मूळ नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी गावची आहे. तिच्या माहेरकडील कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आहे. 

Ashok Kharat- Kalpana Kharat | Sarkarnama

वास्तव...

कल्पना खरातचा मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाला असून वडिलांचे आजारापणानं निधन झालं आहे. वृद्ध आई, विधवा भावजयी आणि लहान भाचा असून, त्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे.

Ashok Kharat- Kalpana Kharat | Sarkarnama

वयात अंतर

कल्पना हिच्याशी लग्न करतेवेळी अशोक खरातचे वय जास्त होते. हे लग्न एका नातेवाइकाच्या मध्यस्थीने झाले. खरात वयानं मोठा असल्यानं, त्याच्याच कुटुंबियांनी लग्नाचा खर्च केला.

Ashok Kharat- Kalpana Kharat | Sarkarnama

माहेर तुटलं

लग्नानंतर कल्पनाचे जीवनमान बदललं. ती ऐशोआरामी जीवन जगू लागली. तर दुसरीकडे कल्पनाचा एक भाऊ हा सिन्नर-शिर्डी महामार्गावरील एका हार्डवेअरच्या दुकानाचा व्यवसाय करतो. दुसरा भाऊ हा नाशिकमध्ये आहेत. पण यानंतर माहेरच्या लोकांबरोबर, नातेवाईकांबरोबर तिचे संबंध दुरावले.

Ashok Kharat- Kalpana Kharat | Sarkarnama

NEXT : लहानपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकलेले पंतप्रधान मोदी जेव्हा 'चहाचे शहर' दिब्रूगडला भेट देतात...! पाहा खास फोटो...

Modi Assam Election | Sarkarnama
येथे क्लिक करा....