Deepak Kulkarni
आसाम विधानसभेच्या 2026 च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार तापला आहे.भाजपाने या निवडणुकीसाठी "विकसित आसाम" अन् त्याचसोबत दुहेरी इंजिन सरकारच्या विकासाच्या मुद्द्यावर भर दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी गेल्या 10-12 वर्षांमधील NDA सरकारचा उल्लेख करत शांतता व पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. तसेच ते थेट आसामची खरी ओळख असलेल्या चहाच्या मळ्यातही मोदी पोहोचले आहे.
या आसाम दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिब्रूगडमधील चहाच्या मळ्यालाही भेट दिली आहे. याबाबत मोदींचे फोटो व्हायरल झाले आहेत.
पंतप्रधानांनी स्वतः चहाच्या मळ्यात फेरफटका मारताना चहाची पाने तोडत या अनोख्या अनुभवाचा आनंद घेतला.
मोदींनी यावेळी चहाच्या मळ्यातील महिला कामगारांशी संवादही साधला. त्यांच्या कामाबाबतची माहितीही जाणून घेतली. हा अनुभव अविस्मरणीय असल्याचंही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ एप्रिल २०२६ रोजी आसाममधील दिब्रूगड येथील चहाच्या मळ्याला भेट देऊन चहा कामगारांच्या कष्टाचं कौतुक केले. यावेळी मोदींनी चहा कामगारांना जमिनीचे पट्टे आणि विविध विकास प्रकल्पांचं वाटपही केलं.
या भेटीवेळी आसाममधील चहा कामगारांशी मोदी यांनी त्यांचं आपलं जुनं नातं असल्याचं सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बालपणी वडनगर रेल्वे स्टेशनवर चहा विकल्याचं आपल्या भाषणातून अनेकदा सांगितले आहे.चहा विकून ते त्यांच्या वडिलांना मदत करत असत.
आसाममधील दिब्रूगडला 'भारताचे चहाचे शहर' म्हणून संबोधले जाते. या दौऱ्यात मोदींनी चहा कामगारांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजनांचं वितरण करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.