सरकारनामा ब्यूरो
मुख्यमंत्रिपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची टीम बांधण्यास सुरुवात केली आहे.
सचिव म्हणून फडणवीस यांनी श्रीकर परदेशी यांची नियुक्ती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यालयाच्या महिला प्रधान सचिवपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती केली आहे.
अश्विनी भिडे या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार सांभाळत होत्या.
सांगली या गावात अश्विनी भिडे यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण सांगली जिल्हातील मराठी शाळांमधून पूर्ण केलं. त्यानंतर पुणे विद्यापीठातून इंग्रजी या विषयात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केल आहे.
29 वर्षांचा प्रशासकीय अनुभव असणाऱ्या अश्विनी या 1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
त्यांच्या कारकीर्दीच्या सुरूवातीला कोल्हापुरातून सहाय्यक जिल्हाधिकारी या पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्यभार पाहिला.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणात अतिरिक्त आयुक्त, शालेय शिक्षण-क्रिडा विभागाच्या सचिव, राज्यपालांच्या संयुक्त सचिव म्हणून त्यांनी काम केले.
आश्विनी भिडे यांना टास्कमास्टर, मेट्रोवुमन या टोपण नावाने ओळखले जाते.
'आरे'मधील झाडं मेट्रो कारशेडसाठी तोडल्यानंतर अश्विनी भिडे खूप चर्चेत आल्या होत्या.