Pradeep Pendhare
2001च्या IASबॅचचे अधिकारी असलेले डॉ. श्रीकर परदेशी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण झालेले आहेत.
श्रीकर परदेशी कवठेमहांकाळ (जि. सांगली) शहरातील आहेत. उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्रात त्यांची ओळख झाली आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली होती. यवतमाळ, कोल्हापूर, अकोला, पुणे इथंही काम केले.
बुलडोझर मॅन तथा डिमॉलिशन मॅन म्हणून डॉ. श्रीकर परदेशी पिंपरी-चिंचवडपासून ओळखले जाऊ लागले. तिथं ते आयुक्त होते.
सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांना गौरविण्यात आलेले आहे. जलसंधारणावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे.
सचोटी व कार्यक्षमतेने त्यांना 2015 मध्ये पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) उपसचिव म्हणून प्रतिनियुक्तीवर घेतले होते.
जून 2021ला ते पुन्हा महाराष्ट्रात त्यांची नियुक्ती `सिकॉम`चे व्यवस्थापकीय संचालक झाले.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना जुलै 2022 रोजी श्रीकर परदेशी यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
महायुती सरकारमध्ये श्रीकर परदेशी यांची आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.