Rashmi Mane
नरेंद्र मोदींच्या 3.0 कार्यकाळात अश्विनी वैष्णव यांना मोठी बढती मिळाली. सलग दुसऱ्यांदा रेल्वेमंत्री झालेले अश्विनी वैष्णव यांचा आज वाढदिवस.
अश्विनी वैष्णव यांचा जन्म 18 जुलै 1970 ला राजस्थानच्या पाली जिल्ह्यात झाला. नंतर त्यांचे कुटुंब जोधपूरला आले. वैष्णव यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट अँथनी कॉन्व्हेंट स्कूल, जोधपूर येथून झाले
वैष्णव यांनी एमबीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. यानंतर ते आयआयटी कानपूरमध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये एम.टेक ही पदवी मिळवली.
अश्विनी वैष्णव यांनी 1994 मध्ये यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी ऑल इंडिया रँकमध्ये 27 वा क्रमांक मिळविला आणि ते आयएएस अधिकारी बनले.
वैष्णव यांना ओडिशा कॅडर मिळाले त्यांची पोस्टिंग बालासोर आणि कटक जिल्ह्यात डीएम म्हणून झाली होती.
2003 मध्ये वैष्णव पहिल्यांदा दिल्लीत आले आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांची पीएमओमध्ये उपसचिव म्हणून कार्यरत होते. 2004 मध्ये वाजपेयींचे सरकार गेले तेव्हाही ते खाजगी सचिव म्हणून काम करत राहिले. येथूनच त्यांची भाजपशी जवळीक वाढली.
अश्विनी वैष्णव यांनी 2008 मध्ये IAS नोकरीचा राजीनामा दिला आणि अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीएची केले. त्यानंतर भारतात परतत त्यांनी कॉर्पोरेट जगतात प्रवेश केला. देशातील नामांकित कंपन्यांमध्येही त्यांनी काम केले आहे.
2012 मध्ये वैष्णव यांनी स्वतःची Three Tee Auto Logistics ही कंपनी सुरू केली. अश्विनी वैष्णव हे 2017 पर्यंत या कंपनीचे संचालक होते.
गुजरातमध्ये काम करत असताना अश्विनी वैष्णव नरेंद्र मोदींच्या जवळ आले. मोदींचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता आणि ते तंत्रज्ञानाशी संबंधित विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून सल्ला घेयचे.