Rashmi Mane
आज तुम्हाला अशा एका UPSC उमेदवाराची गोष्ट सांगणार आहोत ज्यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी स्वित्झर्लंड सोडले.
येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत, अंबिका रैना यांच्याबद्दल.
2022 मध्ये UPSC उत्तीर्ण झालेल्या अंबिका रैना यांनी UPSC परीक्षेत 164 वा क्रमांक मिळवला.
श्रीनगरमध्ये जन्मलेली अंबिका रैना लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. वडीलांच्या ट्रांसफरेबल जॉबमुळे त्यांनी देशातील वेगवेगळ्या शहरात जावे लागायचे.
अंबिका यांनी अहमदाबादच्या सीईपीटी विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी पूर्ण केली आहे. यानंतर 2020 मध्ये त्यांना स्वित्झर्लंडमधील एका मोठ्या कंपनीत इंटर्नशिपची संधी मिळाली.
त्या इंटर्नशिपसाठी स्वित्झर्लंडलाही गेल्या. त्यांना इतर अनेक कंपन्यांकडून चांगल्या नोकरीच्या ऑफरही मिळाल्या, पण त्यांचा कल 'यूपीएससी'कडे वाढला आणि त्या भारतात परतल्या.
अधिकारी होण्याचा हा प्रवास त्याच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. पहिल्या दोन प्रयत्नांत त्या अपयशी ठरल्या पण खचून न जाता त्यांनी मेहनत घेतली आणि 2022 च्या यूपीएससी परीक्षा दिली.
2022 चा निकाल त्यांच्या बाजूने लागला. UPSC उत्तीर्ण केल्यानंतर, त्याची IA&AS म्हणजेच भारतीय ऑडिट आणि अकाउंट सर्व्हिससाठी निवड झाली.