गुपचुप दुसरं लग्न उरकणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका, पहिल्या पत्नीला मिळणार 'आर्थिक' दिलासा

Deepak Kulkarni

धडाकेबाज निर्णय

आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज निर्णयांचा सिलसिला कायम ठेवल्याचं समोर आलं आहे.

Assam Government staffers stare at 20% pay cut if rewed sans divorce or first wife | Sarkarnama

बहुपत्नीत्वावरही निर्बंध

आसाम सरकारने यापूर्वी समान नागरी संहिता, तसेच पालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10 टक्के कपात असे निर्णय घेतले आहे. यापुढे पाऊल टाकत आता बहुपत्नीत्वावर निर्बंध आणण्यात आले आहेत.

Assam Government staffers stare at 20% pay cut if rewed sans divorce or first wife | Sarkarnama

पगारात 20 टक्के कपात

आसामचे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी पहिली पत्नी जिवंत असताना किंवा कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरे लग्न गुपचुप उरकणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 20 टक्के कपात केली जाईल.

Assam Government staffers stare at 20% pay cut if rewed sans divorce or first wife | Sarkarnama

थेट खात्यात जमा

संबंधित पहिल्या पत्नीकडून सरकारकडे औपचारिक अर्ज करण्यात आल्यानंतर पतीच्या पगारातील कपात रक्कम थेट तिच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

Assam Government staffers stare at 20% pay cut if rewed sans divorce or first wife | Sarkarnama

खासगी क्षेत्रातही लवकरच निर्णय

आसाम सरकार सरकारीनंतर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही महिलांनाही अशाच प्रकारचं संरक्षण देण्याच विचाराधीन आहे.

Assam Government staffers stare at 20% pay cut if rewed sans divorce or first wife | Sarkarnama

तोपर्यंत कपात सुरू राहणार

जोपर्यंत वैवाहिक वादावर न्यायालयाचा निर्णय अंतिम निर्णय येत नाही,तोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याच्या पगारातील ही कपात सुरू राहू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Assam Government staffers stare at 20% pay cut if rewed sans divorce or first wife | Sarkarnama

अशी अनेक प्रकरणं

सरकारी कर्मचाऱ्यांनी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच आपल्या पत्नीला सोडून देत दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास सुरुवात केली किंवा तिच्याशी लग्न केल्याची अनेक प्रकरणं पाहण्यात आल्याचंही मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितलं.

Assam Government staffers stare at 20% pay cut if rewed sans divorce or first wife | Sarkarnama

सकारात्मक परिणाम

सरकारच्या पालक किंवा पत्नीबाबतच्या निर्णयानंतर भीतीपोटी अनेकजण आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याबाबत हलगर्जीपणा दाखवणार नाहीत,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Assam Government staffers stare at 20% pay cut if rewed sans divorce or first wife | Sarkarnama

मोठं पाऊल

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सरकारचं हे महिला आणि कुटुंब कल्याणाबाबत मोठं पाऊल असल्याचं मानलं जात आहे.

Assam Government staffers stare at 20% pay cut if rewed sans divorce or first wife | Sarkarnama

NEXT: तुम्ही SIR प्रक्रिया पूर्ण केलीये पण 24 ऑगस्टला नाव दिसलं नाही तर? 24 तासांत 'ही' एक गोष्ट कराच!

SIR voter list name missing what to do | Sarkarnama
येथे क्लिक करा...