मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप; काँग्रेसचा बडा नेता गायब...

Rajanand More

आसाम निवडणूक

आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिनिकी भूईया सरमा चांगल्याच प्रकाशझोतात आल्या होत्या. काँग्रेसने त्यांच्यावर केलेल्या आरोपांनी ही निवडणूक गाजली.

2026 Assembly Elections India | Sarkarnama

काय होते आरोप?

रिनिकी सरमा यांच्याकडे तीन देशांचे पासपोर्ट असल्याचा आरोप काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केला होता. रिनिकी यांच्यासह मुख्यमंत्र्यांनीही हे आरोप फेटाळून लावले.

Riniki Sarma | Sarkarnama

गुन्हा दाखल

रिनिकी यांच्या तक्रारीनंतर खेडा यांच्याविरोधात आसाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडा गायब झाले आहेत.

Pawan Khera | Sarkarnama

पोलिसांची छापेमारी

आसाम पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने खेडा यांच्या दिल्लीतील घरावर छापेमारीही केली. तिथून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आदी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

Pawan Khera | Sarkarnama

खेडा हैदराबादमध्ये

पवन खेडा हे हैदराबादमध्ये लपून बसल्याचा दावा भाजपने नेत्यांनी केला आहे. त्यांचा एक कारमधील मान खाली घातलेला व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

Pawan Khera | Sarkarnama

सरमांचा संताप

हिमंता बिस्वा सरमा हे खेडा यांच्यावर चांगलेच संतापले असून ते पाताळात लपले असले तरी आसाम पोलीस त्यांना शोधून काढतील, असे सरमा म्हणाले आहेत.

Himanta Biswa Sarma | Sarkarnama

अटक होणार?

आसाम पोलिसांकडून पवन खेडा यांनी थेट अटक केली जाऊ शकते. कारण त्यांच्याविरोधात अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pawan Khera | Sarkarnama

अटकपूर्व जामीन

खेडा यांनी बुधवारी (ता. ८ एप्रिल) गुवाहाटी हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. कोर्टात त्यांना दिलासा न मिळाल्यास अटक होऊ शकते.

Pawan Khera | Sarkarnama

NEXT : माजी मुख्यमंत्र्यांची सून अन् विद्यमान CM च्या पत्नी, दोघींमुळे विधानसभा निवडणुकीत धुराळा...

येथे क्लिक करा.