माजी मुख्यमंत्र्यांची सून अन् विद्यमान CM च्या पत्नी, दोघींमुळे विधानसभा निवडणुकीत धुराळा...

Rajanand More

आसाम निवडणूक

आसाम विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी आगळावेगळा प्रचार पाहिला मिळाला. विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसह माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेमुळे ही निवडणूक गाजली.

2026 Assembly Elections India | Sarkarnama

माजी मुख्यमंत्र्यांची सून

निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांची सून आणि काँग्रेसचे खासदार व प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांच्यावर गंभीर आरोप झाले.

Elizabeth Gogoi, Gaurav Gogai | Sarkarnama

ISI कनेक्शन

गौरव गोगोईंच्या पत्नी एलिझाबेथ यांचे आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला होता. त्याच्या चौकशीसाठी त्यांनी समितीही नेमली होती.

Elizabeth Gogoi, Gaurav Gogai | Sarkarnama

काँग्रेस बॅकफूटवर

आरोपांमुळे निवडणुकीआधीच काँग्रेस बॅकफुटवर आली. निवडणुकीतही भाजपने प्रचारात हा मुद्दा घेतला होता. गोगोई यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Congress | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची पत्नी

मुख्यमंत्री सरमा यांच्या पत्नी रिनिकी भूयान शर्मा यांच्यावरही काँग्रेसने प्रचार शिगेला पोहचलेला असतानाच आरोप केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह भाजपला धक्का बसला.

Riniki Bhuyan Sharma | Sarkarnama

पलटवार

सरमा यांच्यासह रिनिकी यांनी काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांचे आरोप खोडून काढले. रिनिकी यांच्याकडे तीन देशांचे पासपोर्ट असल्याचा आरोप खेडा यांनी केला होता.

Riniki Bhuyan Sharma, Himanta Biswa Sarma | Sarkarnama

गुन्हा दाखल

रिनिकी यांच्या तक्रारीनंतर पवन खेडा यांच्याविरोधात आसाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे खेडा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आरोपांविरोधात रिनिकी अत्यंत आक्रमक झाल्या आहेत.

Riniki Bhuyan Sharma | Sarkarnama

दोन नेत्यांच्या पत्नी

आसामच्या निवडणुकीत यावेळी दोन प्रमुख नेत्यांच्या पत्नी चर्चेत राहिल्या. सरमा आणि गोगोई यांच्यात टफ फाईट होत असून त्यामध्ये त्यांच्या पत्नींमुळे प्रचाराचा पारा चांगलाच वाढला होता.

Riniki Bhuyan Sharma | Sarkarnama

NEXT : लंडन रिटर्न महिला उमेदवाराचे थेट पॉवरफुल मुख्यमंत्र्यांना आव्हान; राहुल गांधींचा दमदार पाठिंबा...

येथे क्लिक करा.