Rajanand More
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी ९ एप्रिलला मतदान आहे. भाजप विरूध्द काँग्रेस अशीच प्रमुख लढत या निवडणुकीत होणार आहे.
निवडणुकीत कुंकी चौधरी या महिला उमेदवाराची चांगलीच चर्चा होत आहे. त्या असम जातीय परिषदेच्या गुवाहाटी सेंद्रल मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. परिषदेची काँग्रेससोबत आघाडी आहे.
27 वर्षीय कुंकी यांनी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतले आहे. सप्टेंबर महिन्यातच मायदेशी परतल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाची एक शैक्षणिक ट्रस्ट असून अनेक संस्था चालविते. कुंकी तिथेच सक्रीय आहेत.
परदेशातून परतल्यानंतर त्यांना परिषेदकडून उमेदवारीची ऑफर मिळाली. सुरूवातीला नकार दिल्यानंतर आता त्यांनी भाजपचे मातब्बर नेते विजय कुमार गुप्ता यांना आव्हान दिले आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रचारादरम्यान कुंकी यांच्या आईवर गंभीर आरोप केले. कुंकीच्या आईने बीफ खातानाचे फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्याचा सरमा यांनी आरोप केला.
कुंकी यांनी आक्रमकपणे आरोप फेटाळले. कोणत्याही सन्मानीय नेत्याने व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्तरावर जाऊन आरोप करू नये. हा राजकारणातील खूप खालची पातळी असल्याचा हल्ला त्यांनी चढविला.
सुरूवातीला कुंकी यांची उमेदवारी फारशी दमदार वाटत नव्हती. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोईंसह अनेक नेत्यांनी प्रचाराता एन्ट्री घेतल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे.
कुंकी यांच्याविषयी प्रामुख्याने महिला आणि युवकांमध्ये मोठे आकर्षण आहे. त्यातच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना शिंगावर घेतल्याने त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.
NEXT : भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, आता मोठी नामुष्की! खासदारकीचा निकाल फिरणार?