Jagdish Patil
पुरामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो नागरिक पूराच्या विळख्यात आहेत.
आतापर्यंत पुरामुळे 89 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 365 गावे अजूनही पाण्याखाली आहेत.
सोमवारच्या तुलनेत आता पूरस्थितीत काहीशी सुधारणा झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
पूरग्रस्तांसाठी प्रशासनाने चार जिल्ह्यांमध्ये 55 मदत छावण्या आणि मदत वितरण केंद्रे सुरू केली आहेत.
पुरामुळे 15 हजार 342.92 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो नागरिक बेघर झाले असून, अनेकांची घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
अनेक ठिकाणी कार आणि इतर वाहने पुराच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली, तर काही ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासनासह NDRF आणि SDRF ची पथके बचावकार्य राबवत आहेत.