Jagdish Patil
शिक्षणमहर्षी तथा माजी राज्यपाल पद्यश्री डॉ. डी.वाय पाटील यांचं मंगळवारी (ता.०४) वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं.
त्यांनी DY पाटील समूहाअंतर्गत अनेक अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर उच्च शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत.
मंगळवारी (ता.०४) कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याच पार्श्वभूमीवर DY पाटील यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
डी.वाय पाटील यांचं पूर्ण नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील असं आहे.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून झाली.
डी.वाय पाटील यांचे राजकीय गुरू दिवंगत लोकनेते राजारामबापू पाटील हे होते.
तर त्यांना शिक्षण संस्थांचं जाळं उभारण्यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मदत केली होती.
डी.वाय पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना १९९१ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
डी. वाय. पाटलांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षातून सार्वजनिक जीवनात काम केले. नंतर ते राष्ट्रवादीमध्ये सहभागी झाले.