Chetan Zadpe
ईशान्येतील नागालँड या राज्याची विधानसभा इमारत आधुनिक तंत्रज्ञाने निर्माण केली आहे. ही इमारत पाहायला सुंदर वाटते.
आसाम विधानसभेची इमारत ही आसामच्या संस्कृतीप्रमाणे आहे. प्रामुख्याने काचेचे बनवलेले प्रवेशद्वार लक्ष वेधून घेते.
मेघालय राज्याची विधानसभा इमारत फार प्रशस्त आणि आकर्षक आहे. या इमारतीचे घुमट अतिशय सुंदर दिसते.
त्रिपुरा राज्याची दुमजली विधानसभा इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेते. या इमारतीचा बाह्यभाग संपूर्णपणे पांढऱ्या शुभ्र रंगात सुंदर दिसतो.
अरुणाचल प्रदेशाची इमारत पारंपरिक पद्धतीने उभारण्यात आली आहे. या इमारतीचे प्रवेशद्वार अतिशय देखणे आहे.
मिझोरम राज्याची विधानसभा इमारत इतर सर्व राज्यांच्या तुलनेत लहान असल्याचे दिसते, परंतु 40 आमदारांच्या सभागृहासाठी ही इमारत पुरेशी ठरते.