Chetan Zadpe
'सॅम बहादूर' या नावाने सॅम मानेक शॉ यांच्या जीवनावर आधारित सिनेमा सध्या चित्रपटगृहामध्ये गर्दी खेचत आहे. यामुळे 'सॅम माणेकशॉ' हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सॅम माणेकशॉ यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ रोजी पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव सॅम होर्मसजी फ्रँमजी जमशेटजी माणेकशॉ होते, परंतु त्यांना सर्व सॅम किंवा 'सॅम बहादूर' म्हणत.
सॅम माणेकशॉ यांनी आपले प्राथमिक शालेय शिक्षण उत्तराखंडमधील नैनिताल येथून केले आणि त्यानंतर हिंदू सभा महाविद्यालयातून वैद्यकीय (Medical) शिक्षण पूर्ण केले.
सॅम माणेकशॉ यांनी 1932 मध्ये इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि दोन वर्षांनी 4/12 फ्रंटियर फोर्स रेजिमेंटमध्ये सामील झाले.
बर्मीच्या लढाईवर असताना एका जपानी सैनिकाने आपल्या मशिनगनमधून सात गोळ्या माणेकशॉ यांच्या छातीवर झाडल्या. मात्र, उपचारात मृत्यूशी झुंज देत, त्यांनी ही लढाईही जिंकली.
ब्रिगेडियर बहराम पंताखी त्यांच्या 'सॅम माणेकशॉम-द मॅन अँड हिज टाइम्स' या पुस्तकात लिहितात, 'माणेकशॉ यांनी इंदिरा गांधींना 'तुम्ही गोपनीयतेची शपथ घेतली नसल्याने तुम्ही ऑपरेशन रूममध्ये चर्चेसाठी येऊ शकत नाही, असे म्हंटले होते. मात्र, यामुळे सुदैवाने संबंध बिघडले नाहीत.
1971 च्या युद्धात इंदिरा गांधींना मार्चमध्येच पाकिस्तानवर हल्ला करायचा होता. मात्र, माणेकशॉ यांनी असे करण्यास नकार दिला. त्यांना ती वेळ चुकीची वाटत होती. मात्र, यावर इंदिरा गांधीही संतप्त झाल्या होत्या. यानंतर रणनीती आखून भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.