Pradeep Pendhare
तब्बल 40 वर्षानंतर आपला पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 या कार्यकाळात सलग पाच वर्षे 12 दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
2014 मध्ये महाराष्ट्रात पहिल्यादांचा भाजपचा मुख्यमंत्री झाला अन् त्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला.
2019 मध्ये सत्ता समीकरण बदलताच महाविकास आघाडी सरकार सत्ता स्थापन करण्याची तयारी केली.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 या पाच दिवसांच्या कार्यकाळासाठी फडणवीस मुख्यमंत्री होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री पदी राहण्याचा नवा विक्रम जोडला गेला आहे.
देवेंद्र फडणवीस 1989 मध्ये ABVP सक्रिय सदस्य होते. त्यानंतर 1992 मध्ये ते नागपूर नगरपालिकेचे नगरसेवक होताना तेव्हापासून सक्रिय राजकारणात आहे.