Pradeep Pendhare
जयश्री थोरात या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची नात, तर काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची धाकटी कन्या आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांची जयश्री थोरात या मामेबहीण आहेत.
संगमनेर मतदारसंघात विधानसभेसाठी वडील बाळासाहेब थोरात यांच्या प्रचाराची धुरा जयश्री थोरात संभाळत असून, युवा संवाद यात्रा काढली आहे.
भाजप माजी खासदार सुजय विखे संगमनेरमधून निवडणुकीसाठी चाचपणी करत असल्याने जयश्री थोरात आणि सुजय विखेंमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय.
धांदरफळमधील सभेत सुजय विखे यांच्या भाषणापूर्वीच समर्थक वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह विधान केल्यानं संगमनेरमध्ये पडसाद उमटलेत.
जयश्री थोरातांवर विखे समर्थकांनी आक्षेपार्ह विधान केल्याने विखेंसह भाजपच्या संस्कृतीवर राज्यभरात विरोधकांनी निषेध नोंदवायला सुरवात केली आहे.
विखे, समर्थक आणि सभा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी माजी आमदार सुधीर तांबे, दुर्गा तांबे आणि समर्थकांची संगमनेर पोलिसांकडे मागणी.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत जयश्री थोरात यांनी सहभाग घेत राजकीय वाटचालीचे संकेत दिले होते.
जयश्री थोरात यांचे 'MBBS' असं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं असून सुरवातीला त्यांनी टाटा रुग्णालयातील कॅन्सर विभागात काम केलं आहे. पती हसन जैन देखील डॉक्टर आहेत.