Pradeep Pendhare
अपक्ष आमदार गीता जैन यांची 2019 च्या निवडणुकीवेळी संपत्ती 70.44 कोटी होती, आताच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 392.30 कोटी एवढी झाली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची 2019 च्या निवडणुकीवेळी संपत्ती 38.09 कोटी होती, आता त्यांची संपत्ती 129.81 कोटीवर आहे.
राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार पराग शाह यांची संपत्ती 2019 मध्ये 500.62 कोटी होती. आता त्यांची संपत्ती 3383.06 कोटी रुपये एवढी झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपत्ती 2019 मध्ये 11 कोटी 56 लाख होती. आता ती 37 कोटी 68 लाख 58 हजार एवढी आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांची संपत्ती 2019 मध्ये 6 कोटी 11 लाख होती. ती आता 22 कोटी 55 लाख रुपये एवढी झाली आहे.
मंत्री तानाजी सावंत यांची 2019 मध्ये संपत्ती 194.5 कोटी एवढी होती. ती आता 218.1 कोटी रुपये एवढी आहे.
मंत्री दीपक केसरकर यांची 2019 मध्ये 59.70 कोटी रुपये संपत्ती होती. ती आता 98.50 कोटी रुपये एवढी झाली आहे.