Pradeep Pendhare
उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 मध्ये मुंबईत झाला. जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधून पदवी घेतली. सिद्धहस्त लेखक, हौशी छायाचित्रकार आहेत.
महाबळेश्र्वरमध्ये शिवसेनेचे 30 जानेवारील 2003मध्ये अधिवेशनात बाळासाहेबांच्या गैरहजेरीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला.
उद्धव ठाकरे यांनी ठाकरे घरण्याचा पहिला आणि शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची सूत्रे हाती घेतली.
कोरोना काळ, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण, कंगना राणावतचे वाक्बाण, अर्णब गोस्वामी आणि टीआरपी घोटाळा मुद्यांवर कसोटी लागली.
शिवसेनेत 20 जून 2022 मध्ये ऐतिहासिक बंड एकनाथ शिंदे यांनी करत गुजरातच्या सुरतला, गुवाहाटी, गोव्यापर्यंत प्रवास करत पुन्हा महाराष्ट्रात पोचले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शिंगावर घेतले.
महाविकास आघाडीचे सरकार आणताना सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारत असतील, तरच पाठिंबा अशी भूमिका घेतली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर एकटे पडलेल्या उद्धव ठाकरेंबरोबर खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना अंगावर घेतले.
शिवसेनेच्या वाटचालीत आतापर्यंत चार बंड झाले. पहिले तीन बाळासाहेब ठाकरेंच्या हयात असताना झाले. पण बंडखोरीचा प्रभाव पक्षावर प्रदीर्घ काळापर्यंत राहिला नाही.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मात्र शिवसेनेची दोन शकले झाली. मुळ शिवसेना आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेली. उद्धव ठाकरेंकडे मशाल चिन्ह आहे.