सरकारनामा ब्यूरो
भाजपा या पक्षाने विधानसभेसाठी एकूण 149 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यामधून 132 इतके उमेदवार निवडून आले आहेत. भाजपचा स्ट्राईक रेट तब्बल 88.89 टक्के आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट 70.37 टक्के आहे. 81 जागांसाठी शिंदेंचे उमेदवार मैदानात उतरवले होते, त्यापैकी त्यांनी 57 जागेवर विजय मिळवला.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकूण 59 उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. त्यापैकी 41 निवडून आले. राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट तब्बल 69.49 टक्के आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकूण 95 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते, त्यापैकी त्यांचे फक्त 20 उमेदवार विजयी झाले. ठाकरेंच्या पक्षाचा स्ट्राईक रेट अवघा 21 टक्के आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 86 जागा लढवल्या होत्या. त्यातील फक्त 10 निवडून आल्या आहेत. या पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात कमी 11 टक्के आहे.
काँग्रेसने एकूण 101 जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले होते. यापैकी त्यांना 16 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसचा स्ट्राईक रेट 15 टक्के आहे.
मनसेनं विधानसभा निवडणुकीसाठी 125 उमेदवार रिंगणात उतरवले होते. परंतु त्यांना एकाही ठिकाणी विजय मिळवता आला नाही.
वंचित बहुजन आघाडीने 200 जागांसाठी त्यांचे उमेदवार उभे केले होते, पण त्यांना एकही जागा मिळली नाही.
एकूण 2 हजार 86 अपक्ष उमेदवारांपैकी अवघ्या 12 जणांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली.