Mangesh Mahale
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली.
केरळच्या वायनाड मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी विजयी झाल्या आहेत.
हातात संविधान घेऊन प्रियांका गांधी यांनी आज खासदारकीची शपथ घेतली.
केरळमधील पारंपरिक प्रियांका गांधी यांनी शपथविधीवेळी परिधान केली होती.
खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन शेरणी संसद मे आ गयी...असे म्हणत प्रियांका यांच स्वागत केलं आहे.
शपथ घेण्यापूर्वी भाऊ राहुल गांधी यांनी त्यांची छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपली.
प्रियांका या गांधी घराण्यातल्या चौथ्या महिला सदस्य म्हणून लोकसभेत पोहोचल्या आहेत.
इंदिरा गांधी, सोनिया गांधी, मनेका गांधी या लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत.
राहुल गांधी यांनी प्रियांका व आई सोनिया यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.