Aslam Shanedivan
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांची, तर पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक जाहीर केली आहे.
या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नवीन ४,६६० पूरक मतदान केंद्रांची घोषणा केली असून नवीन मतदान केंद्रांपैकी २ हजार २०० केंद्रे पश्चिम बंगालमधील आहेत.
यामुळे पश्चिम बंगालमधील एकूण मतदान केंद्रांची संख्या ८५ हजार ३७९ इतकी झाली असून मतदारांच्या सोयीसाठी ३२१ मतदान केंद्रांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
दरम्यान पश्चिम बंगालमधील माल्दा हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर सुरक्षा वाढण्यात आली असून आतापर्यंत ३५ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळमधील तिरुवल्ला येथे सभा तर तिरुवनंतपुरममध्ये रोड शो केला. तर आता ते केरळमधील एनडीएच्या उमेदवारांशीही संवाद साधणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केरळमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली असून, ते अलप्पुझा इथं यूडीएफसाठी प्रचारसभा घेतली.
पंतप्रधान मोदींनी पुद्दुचेरी इथं रोड-शो केला, तर अमित शाह यांनी आसाममध्ये प्रचारसभा घेतल्या आहेत. तामिळनाडूसाठी भाजप अन् काँग्रेसने प्रत्येकी २७ उमेदवार जाहीर केले आहेत.