न्यायलयीन कोठडी आणि पोलीस कोठडी यातील फरक काय?

Ganesh Sonawane

पोलीस कोठडी

पोलीस कोठडी म्हणजे जेव्हा पोलीस एखाद्या व्यक्तीला अटक करतात, त्यानंतर आरोपीला पोलीस स्टेशनच्या लॉक-अपमध्ये किंवा संबंधित प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणेच्या भौतिक कोठडीत ठेवले जाते.

judicial custody, police custody | Sarkarnama

चौकशी

पोलिस कोठडीत ठेवलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलीस चौकशी करतात आणि पुरावे गोळा करतात.

judicial custody, police custody | Sarkarnama

दंडाधिकारी

पोलीस कोठडीचा कालावधी सामान्यत: एका गुन्ह्यात 15 दिवसांपर्यंत असतो. यासाठी दंडाधिकारी ठरवतो की आरोपी पोलीस कोठडीमध्ये ठेवावा का न्यायालयीन कोठडीमध्ये.

judicial custody, police custody | Sarkarnama

24 तास

संशयिताला अटक केल्यानंतर 24 तासांच्या आत पोलीसांना त्याला न्यायालयात हजर करावं लागते व आणखी पोलिस कोठडी हवी असल्यास न्यायालयाकडे मागणी करावी लागते.

judicial custody, police custody | Sarkarnama

कारागृह

न्यायालयीन कोठडी म्हणजे आरोपीला कारागृहात ठेवणे आणि त्याला न्यायालयाच्या ताब्यात देणे.

judicial custody, police custody | Sarkarnama

कारागृह

जेव्हा आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली जाते, तेव्हा त्याला पोलीस कोठडीमध्ये नाही तर कारागृहात ठेवले जाते. (उदा. येरवडा, आर्थर रोड)

judicial custody, police custody | Sarkarnama

जामीन

न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीला जामीन अर्ज दाखल करण्याचा अधिकार असतो. जामीन मंजूर झाल्यास त्याची न्यायालयीन कोठडी संपते.

judicial custody, police custody | Sarkarnama

कालावधी

न्यायालयीन कोठडी अधिकतम 90 दिवसांपर्यंत असू शकते, जर गुन्हा गंभीर असेल (जसे की 10 वर्षांपेक्षा जास्त कारावास असलेला). इतर सर्व सामान्य गुन्ह्यांसाठी 60 दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवता येते.

judicial custody, police custody | Sarkarnama

मुख्य फरक

पोलीस कोठडीमध्ये तपास आणि चौकशी चालू असते. संशयितावर पोलिसांचे नियंत्रण असते. तर न्यायालयीन कोठडीमध्ये आरोपीला न्यायालयाच्या ताब्यात ठेवले जाते आणि त्याची जामीन अर्जाची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

judicial custody, police custody | Sarkarnama

NEXT : खरातच्या पत्नीचे विदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद.. काय असते लुकआउट नोटीस?

Ashok Kharat- Kalpana Kharat | Sarkarnama
येथे क्लिक करा