सरकारनामा ब्यूरो
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून 'मशाल' या चिन्हावर आणि मनसेतून अमित ठाकरे हे माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
कर्जत- जामखेड येथून रोहित पवार आणि बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवत आहेत.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातून निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघात तर नितेश राणे हे भाजपातून कणकवली मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत.
अमित देशमुख लातूर शहर मतदारसंघातून तर त्यांचे भाऊ धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर योगेश क्षीरसागर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बीड या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत.
विजयकुमार गावित- शरद गावित
नंदूरबार मतदारसंघातून भाजपकडून विजयकुमार गावित निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांचे भाऊ शरद गावित नवापुर या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
राहुल आहेर भाजपकडून तर केदा आहेर अपक्ष उमेदवार म्हणून चांदवड या मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.