सरकारनामा ब्यूरो
झारखंड विधानसभा निवडणूकीमध्ये करोडपती उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे स्वतःच्या संपत्तीपेक्षा देखील जास्त कर्ज असणारे उमेदवार देखील निवडणूक लढत आहेत.
अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे कुशवाह बिनोदसिंह यांची संपत्ती 16 कोटी आहे. मात्र, त्यांच्यावर 302 कोटी रुपयाचं कर्ज आहे.
नवीन जायस्वाल रांची विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढत आहेत. त्यांची संपत्ती 18 कोटी इतकी असून त्यांच्यावर 8 कोटींचे कर्ज आहे.
जमेशदपूर येथून विधानसभेची निवडणूक लढवणारे शिवशंकर यांची एकूण मालमत्ता 25 कोटी एवढी आहे. तर त्यांच्यावर ८ कोटींचे कर्ज आहे.
समाजपार्टीकडून गढवा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे माजी मंंत्री गिरीनाथ सिंग यांच्या नावे 19 कोटीची संपत्ती आहे. तर, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर तीन कोटी रुपयांचे कर्ज आहे.
सौरव विष्णू हे जमशेदपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. कोट्यावधीचे मालक असणारे सौरव यांच्यावर 2 कोटींचे कर्ज आहे.
बरकाथा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेंद्र प्रसाद मोदी यांच्यावर 2 कोटींचे कर्ज आहे.
गढवा मतदारसंघातून निवडणूक लढणारे अपक्ष उमेदवार सतीश कुमार यांच्यावर देखील तीन कोटींचे कर्ज आहे.