हेमंत पवार
नांदगावच्या मंगल आवळे यांनी वयाची मर्यादा ओलांडून घेतली प्रेरणादायी झेप!
65 वर्षांच्या वयात रिक्षा चालवण्याचा निर्धार केला. आरटीओ ऑफिसकडून नोटीस मिळाल्यावरही डगमगल्या नाहीत!
पतीचे निधन, जबाबदाऱ्या अंगावर एक मुलगा व तीन मुलींच्या संसारासाठी मंगल आवळेंनी घेतला रिक्षा चालवण्याचा निर्णय.
शिकण्याची तयारी, परिस्थितीवर मात. शासनाच्या नियमांचं पालन करत एप्रिलमध्ये शिकाऊ परवाना मिळवला.
एक दिवस बच्चू कडू कराडमध्ये आले होते. त्यांनी देखील मंगल आजींच्या रिक्षातून प्रवास केला होता. तेही थक्क झाले त्यांच्या जिद्दीवर.
रोज सराव, जिद्द आणि आत्मविश्वास. तीन चाकी प्रवासी रिक्षासाठी प्रशिक्षण घेतलं आणि टेस्टसाठी सज्ज झाल्या.
आरटीओ टेस्टमध्ये यशस्वी! कऱ्हाड आरटीओ ऑफिसमध्ये दिलेल्या टेस्टमध्ये यश मिळवत पक्क्या लायसन्सचा मार्ग मोकळा केला.
साक्षीदार ठरले अधिकारी विंदा गुरावे, चैतन्य कणसे, सागर विश्वासराव, वैभव तोरणे, भारत गोरड यांच्यासमोर टेस्ट पूर्ण केली.
वय नाही, मन मोठं हवं!" मंगल आवळेंचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी. स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमचं वाट पाहत आहे!