Aslam Shanedivan
जगभरात सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे खासगी नोकरी कधी जाईल याचा काही नेम नाही.
पण असा वेळी भारतातील केंद्र सरकारच्या ESIC (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) च्या अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना दिलासा देणारी आहे
या योजना अंतर्गत नोकरी 90 दिवस म्हणजेच 3 महिन्यांपर्यंत पगाराच्या 50 टक्के रक्कम बेरोजगारी भत्ता म्हणून मिळू शकते.
केंद्र सरकार ABVKY या अंतर्गत पात्र विमाधारक व्यक्तीला आयुष्यात एकदाच ही मदत मिळू शकते
ही योजना ESI अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी असून ती प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. मात्र आता तिचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आला.
या योजनेअंतर्गत नोकरी गेल्यानंतर सुरुवातीला पगाराच्या 25 टक्के आणि त्यानंतर ही वाढवून पगाराच्या 50 टक्के करण्यात आली.
नोकरी जाण्यापूर्वी कर्मचारी किमान एक वर्ष नोकरीत असणे, त्याची ESIC मध्ये नोंदणी आणि किमान 78 दिवसांचे अंशदान जमा केलेले असणे आवश्यक आहे. क्लेम नोकरी गेल्यानंतर 30 दिवसांनी करता येतो.
www.esic.in या ESIC च्या पोर्टलवर जाऊन Employee Portal मध्ये ABVKY Eligibility या पर्यायावर क्लिक करा. येथे इन्शुरन्स नंबर आणि मोबाइल नंबरवर आलेला OTP टाकत फॉर्म सबमिट करा.
क्लेम करण्यासाठी कर्मचाऱ्याकडे शपथपत्र, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती आणि क्लेम फॉर्म असावा. शिवाय ही कागदपत्रे ESIC शाखेत किंवा DCBO कार्यालयात जमा करावी लागतील.