सरकारनामा ब्यूरो
"मी समृद्ध, मजबूत आणि काळजी घेणाऱ्या भारताचे स्वप्न पाहतो. महान राष्ट्रांच्या समुदायात पुन्हा सन्मानाचे स्थान मिळवून देणारा भारत."
"माझा विश्वास आहे की लोकशाही ही राष्ट्रांमधील शांतता आणि सहकार्याची सर्वोत्तम हमी आहे".
"आम्ही सर्व धर्मांच्या समान आदरावर विश्वास ठेवतो,भारताच्या धर्मनिरपेक्षतेला कोणीही आव्हान देऊ नये."
"दहशतवाद ही एक ज्वलंत जखम बनली आहे. तो मानवतेचा शत्रू आहे."
"युद्धांमध्ये आपली मौल्यवान संसाधने वाया घालवू नयेत..जर आम्हाला युद्ध करायचेच असेल तर ते बेरोजगारी, रोगराई, गरिबी आणि मागासलेपणावर करावे."
"राजकीय आधारावर कोणालाही अस्पृश्य मानले जाऊ शकत नाही".
"विजय-पराजय हा जीवनाचा भाग आहे, ज्याकडे समभावनेने पाहावे".
"प्रादेशिक पक्ष एक मजबूत शक्ती म्हणून उदयास आले आहेत आणि ते देखील राष्ट्रीय राजकारणात स्थान देण्यास पात्र आहेत".