Sachin Fulpagare
भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या राजकीय जीवनातील प्रसंग पुन्हा चर्चेत आले आहेत.
वाजपेयींचे नाव घेत मोदी-शाहांवर निशाणा
भाजपचे विरोधी पक्षातील नेते कायमच वाजपेयींचे नाव घेत विद्यमान भाजप आणि अटल सरकारमध्ये तुलना करतात. PM मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर टीकेचे बाण सोडतात.
योग्य व्यक्ती चुकीच्या पक्षात, असे म्हणत विरोधी पक्षाचे नेते वाजपेयींना उकसवत होते. मात्र, वाजपेयी हसतच विरोधकांना प्रत्युत्तर द्यायचे. या निमित्ताने मुखवटा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
गोविंदाचार्य म्हणाले होते...
वाजपेयींची संघटनेत कुठलीही ताकद नाही. ते पक्षासाठी फक्त एक मुखवटा आहेत. त्यांचे महत्त्व एखाद्या नाटकातील भूमिकेएवढे आहे, असे त्यावेळी गोविंदाचार्य म्हणाले होते.
वाजपेयींचे खरमरीत पत्र
गोविंदाचार्यांनी वक्तव्य नाकारले. पण वाजपेयींनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी गोविंदाचार्य आणि अडवाणींना पत्र लिहिले. अडवाणींना भक्कम करून वाजपेयींचा प्रभाव कमी करण्यासाठी संघाने गोविंदाचार्यांना पाठवल्याचे बोलले जाते.
मी भाजपचा केवळ मुखवटा आहे तर, मला या कार्यक्रमात का बोलवले?, भाजप आणि संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर एका कार्यक्रमात वाजपेयींनी हे सुनावले होते.
अडवाणींसोबतच्या एका कार्यक्रमात वाजपेयींनी नाराजी उघड केली होती. मी आता भाजपचा चेहराही नाही. मी फक्त एक मुखवटा आहे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते.