Jagdish Patil
अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व होतं.
भारतीय राजकारणाचे 'भीष्म पितामह' अशी ओळख असलेल्या वाजपेयींची आज जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया.
अटल बिहारी वाजपेयी हे एकदा दोनदा नव्हे, तर तब्बल तीनदा पंतप्रधान बनले होते.
ते पहिल्यांदा 1996 मध्ये पंतप्रधान झाले. तेव्हाच लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता.
ते एकमेव असे खासदार होते जे उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात अशा 4 वेगवेगळ्या राज्यांतून निवडून आले होते.
अटल बिहारी वाजपेयी यांनी कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली होती.
वाजपेयींची संघाच्या गणवेशातील वापरून वापरून जुनी झालेली खाकी पॅन्ट त्यांची बहीण फेकून द्यायची.
वाजपेयी हे सर्वात लोकप्रिय राजकारणी आणि बिगरकाँग्रेसी असे पहिले पंतप्रधान होते ज्यांनी आपल्या पदावर 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता.